सफाई कामगारानेचं केली तरुणीची हत्या! पवई पोलिसांनी असा शोधला आरोपी

पवई पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर या मुलीच्या हत्येचं कारण समोर आलं आहे.
सफाई कामगारानेचं केली तरुणीची हत्या! पवई पोलिसांनी असा शोधला आरोपी

मुंबईतील अंधेरी परिसरात एका मुलीचा मृतदेह राहत्या घरी आढळून आल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. रूपल ओगरे असं या मृत महिलेचं नावं असून ती मूळची छत्तीसगड येथील रहिवाशी होती. कामनिमत्त ती मुंबईत बहिणीच्या घरी राहत होती. या प्रकरणात आता पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अधिक चौकशी केल्यानंतर या मुलीच्या हत्येचं कारण समोर आलं आहे.

या प्रकरणी इमारतीत सफाईच काम करणाऱ्या व्यक्तीला पवई पोलिसांनी अटक केली आहे. रुपल हिचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. रुपल ओगरे बहीण आणि मित्रासोबत मरोळ येथील एन जी कॉम्प्लेक्स येथे राहत होती. मात्र, दोघेही कामानिमित्त बाहेर असताना ही घटना घडली. पोलीस तपासात रुपलच्या हत्येचं कारण समोर आलं आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रुपलने इमारतीत सफाईचं काम करणाऱ्या विक्रम आटवाल याला क्लिनिंगसाठी घरी बोलावलं होतं. त्यावेळी रुपल ही घरात एकटी असल्याने आरोपीने दाव साधत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, रुपलने विरोध केल्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. रुपलने विरोध केला त्यावेळी आटवालने चाकूने तिच्यावर वार करत तिची निर्घृण हत्या केली. एका मराठी वृत्तवाहिने या संबंधीचे वृत्त दिलं आहे.

त्याचबरोबर 'टाईम ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास करायला सुरवात केली. तेव्हा त्यांनी इमारतीत असलेले सर्व सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी आरोपी इमारतीत सकाळी ११.३० वाजता गेला होता. त्यानंतर दुपारी खूप वेळानंतर तो बाहेर पडला. सुरवातीस तो गणवेशात आत गेला आणि येताना दुसऱ्या कपड्यांमध्ये बाहेर पडाला. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय खरा ठरला. दरम्यान, गुन्हा केल्यानंतर आरोपीने त्याच्या गणवेशातील सगळे रक्ताचे डाग धुतले. आणि कपडे बदलले आणि इमारतीतून तो बाहेर पडला, हे पोलीस तपासात उघड झालं आहे. या घटनेने परिसरात सगळीकडे खळबळ उडाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in