भांडवली मूल्य निश्चितीचे नियम तयार करणार अभ्यासासाठी खात्यांतर्गत समिती स्थापन तूर्तास मालमत्ता करवाढ नाही- पालिकेची माहिती

मालमत्ता कर वाढ लागू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, अशी माहिती देण्यात आली आहे
भांडवली मूल्य निश्चितीचे नियम तयार करणार अभ्यासासाठी खात्यांतर्गत समिती स्थापन तूर्तास मालमत्ता करवाढ नाही-  पालिकेची माहिती

मुंबई : मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम १५४(१क) व १५४(१ड) मधील तरतुदींनुसार मुंबईतील जमीन व इमारतींच्या भांडवली मुल्यात १ एप्रिल २०२३ पासून बदल करून वर्ष २०२३-२४ करिता मालमत्ता कराची देयके निर्गमित करणे पालिकेस बंधनकारक आहे. भांडवली मूल्य निश्चितेचे नियम तयार करण्यासाठी

प्राथमिक अभ्यास पालिकेतर्फे सुरु असून नियम निश्चितीकरिता खात्याअंतर्गत समिती तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे तूर्तास मालमत्ता कर वाढ नाही, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईतील जमिनी व इमारतींच्या भांडवली मूल्यात १ एप्रिल २०२० पासून बदल करणे पालिकेस बंधनकारक होते. मात्र करोनाच्या संकटामुळे हा बदल करणे वेळोवेळी झालेल्या शासन निर्णय व अधिनियमातील बदल यामुळे पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे मालमत्ता कर वाढ लागू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in