सक्षम पत्नीला आपल्या पतीकडून घरखर्चाचा हक्क मागता येणार नाही

पत्नीने २०१०-११ साली बीडीएस पदवी मिळवल्यानंतर ती मुंबईत दंतचिकित्सक म्हणून सेवा बजावत आहे
सक्षम पत्नीला आपल्या पतीकडून घरखर्चाचा हक्क मागता येणार नाही

व्यवसायने दंतचिकित्सक (डेन्सिस्ट) असतानाही पत्नीला आपल्या पतीकडून घरखर्चाकरिता रक्कम मागता येणार नाही, असे निरीक्षण शहर दंडाधिकारी कोर्टाने नोंदवले. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात पत्नीने आपल्या दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी पतीकडून एक लाख १० हजार रुपयांची रक्कम मागितली होती; मात्र स्वत:च चांगली कमावती असल्याने पत्नीला ही रक्कम देण्यास कोर्टाने नकार दर्शवला.

पत्नीने २०१०-११ साली बीडीएस पदवी मिळवल्यानंतर ती मुंबईत दंतचिकित्सक म्हणून सेवा बजावत आहे. लग्न झाल्यानंतर ती राजस्थानमध्ये एकत्र कुटुंबात राहत होती; मात्र २०१८मध्ये दुसऱ्या अपत्याच्या वेळी गर्भवती असताना ती सासरचे घर सोडून माहेरी निघून आली. सध्या पालकांसोबत ती मालाड येथे राहत आहे. तिने दाखल केलेल्या याचिकेनुसार, पतीचा व्यवसाय असून तो चांगले पैसे कमावत आहे. तसेच त्याच्याकडे चार कार असून ३,५०० स्क्वेअर फूट बंगल्यात राहत आहे. मुलाची जबाबदारी आल्यानंतर मी मात्र गेल्या तीन वर्षांपासून गृहिणी म्हणून राहत होते. माझ्या पालनपोषणाचा खर्च वडिलांनी उचलला होता. त्यामुळे मुंबईत राहण्यासह माझ्या घरखर्चाकरिता १ लाख १० हजार रुपयांची रक्कम देण्याचे निर्देश पतीला देण्यात यावेत, अशी याचिका तिने दाखल केली होती.

“पतीसोबत संसार करण्यासाठी पत्नीकडून अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत. वडिलांच्या घरात राहत असल्यामुळे तिच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटलेला आहे. त्यामुळे तिला इतकी मोठी रक्कम घरखर्चाकरिता देता येणार नाही,” असे निरीक्षण कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नोंदवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in