झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या वतीने झोपड्यांचे डिजिटल सर्वेक्षण केले जाणार

झोपडी धारकाला एस.आर.ए. च्या वतीने डिजिटल स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.
झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या वतीने झोपड्यांचे डिजिटल सर्वेक्षण केले जाणार

शिवडी प्रभाग क्रमांक २०६(२१४) मधील जकेरीया बंदर रोड वरील आझाद नगर वसाहत आणि एम.जेठा चाळ येथील ४०० झोपड्यांचे डिजिटल सर्वेक्षण झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए )च्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच या सर्वेक्षणात झोपडपट्टी धारकाची पात्रता सिद्ध करून पात्र झोपडी धारकाला एस.आर.ए. च्या वतीने डिजिटल स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.

यासर्वे संदर्भात स्थानिक झोपडपट्टी धारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. यासाठी येथील माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी या सर्व रहिवाशांची बैठक फ्रीत वेल हॉल येथे घेतली. यावेळी एस.आर.ए.प्राधिकरणाचे सक्षम अधिकारी जितेंद्र मोहिते तसेच सर्वे करणाऱ्या एजन्सीचे अधिकारी मयूर कांबळे व त्यांचे सहकारी तसेच सचिन पडवळ, शाखाप्रमुख बैजू हिंदोळे, शाखेतील पदाधिकारी आणि स्थानिक झोपडीधारक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित झोपडीधारकांना मार्गदर्शन करण्यात आले, आणि लवकरच येथील सर्वेला सुरवात होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in