दारूच्या नशेत टॅक्सीचालकाने दोन महिलांना उडवले

धडकेत रस्त्यावरच कोसळल्या आणि जखमी झाल्या
दारूच्या नशेत टॅक्सीचालकाने दोन महिलांना उडवले

मुंबई :वडाळा पूर्व येथील विद्यालंकार कॉलेजजवळ दारूच्या नशेत आपल्या मित्राला कारमधून फिरवून आणण्याच्या नादात टॅक्सीचालकाने दोन महिलांना उडवले. दोन्ही महिलांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दारूड्या टॅक्सीचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. टॅक्सीचा मूळ मालक टॅक्सीतच चावी विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या मित्राने दारूच्या नशेत ही कार चालवत दोन महिलांना उडवले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना गुरव या वडाळा पूर्व येथे राहत असून त्या सोमवारी संध्याकाळी घरी परतत असताना विद्यालंकार कॉलेजजवळ एका टॅक्सीने त्यांना मागून धडक दिली. या धडकेत त्या रस्त्यावरच कोसळल्या आणि जखमी झाल्या. याच टॅक्सीचालकाने पुढे उभ्या असलेल्या मनीषा जामदार (३०) यांनाही उडवले. दोघीही गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी लोकांची गर्दी जमा झाल्यानंतर त्यांनी टॅक्सीचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दिनेश बायचुराम जैस्वाल असे महिलांना उडवणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याच्यासोबत मूळ कारमालक मेहबूब हुसेन पटेल हासुद्धा कारमध्ये होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in