पोलीस ठाण्यात मद्यपी तरुणाचा धिंगाणा

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा नोंदविला
पोलीस ठाण्यात मद्यपी तरुणाचा धिंगाणा

मुंबई : मद्यप्राशन करून पोलीस ठाण्यात धिंगाणा घालून पोलिसांना शिवीगाळ करीत मारहाण करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राम प्रकाश पाटील या २७ वर्षांच्या तरुणाविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. जयराम कारभारी शेळके हे पोलीस हवालदार असून, ते सध्या पार्कसाईट पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मंगळवारी दुपारी तीन वाजता ते पोलीस ठाण्यात असताना तिथे प्रदीप पुजारी नावाचा तरुण आला. त्याने त्याच्या दुकानात एक तरुण दारुच्या नशेत शिवीगाळ करून गोंधळ घालत असल्याची माहिती दिली होती.

यावेळी धिंगाणा घालणाऱ्या राम पाटील याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तिथे आणल्यानंतर त्याने पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्याने जयराम शेळके यांना पाठीमागून पकडून त्यांना जोरात भिंतीवर आपटले. त्यात त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती.

logo
marathi.freepressjournal.in