हावडा जिल्ह्यात ज्यूट गिरणीला आग

विजयश्री ज्यूट मिल असे या गिरणीचे नाव असून गिरणीचे मालक राघवेंद्र गुप्ता यांनी आगीची अधिक चौकशी केली जात असल्याचे सांगितले
हावडा जिल्ह्यात ज्यूट गिरणीला आग

कोलकाता : पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात सोमवारी पहाटे ४.५० वाजण्याच्या सुमारास फोरशोअर रोडवर एका तागाच्या गिरणीला आग लागून सुमारे २० ते ३० टन कच्चा ताग नष्ट झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यात कोणती प्राणहानी झाल्याचे वा आतमध्ये कोणी अडकल्याची माहिती तूर्तास तरी हाती आलेली नाही.

छट पूजेसाठी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांनी आणि गिरणीच्या सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी ही आग पाहिली आणि शिबपूर पोलीस ठाण्याला प्रथम माहिती दिली. त्यानंतर दोन अग्निशमन बंब तेथे पोहोचले.

विजयश्री ज्यूट मिल असे या गिरणीचे नाव असून गिरणीचे मालक राघवेंद्र गुप्ता यांनी आगीची अधिक चौकशी केली जात असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी.

गुप्ता हे इंडियन ज्यूट मिल असोसिएशनचेही अध्यक्ष असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली आहे की फटाक्यांमुळे लागली आहे, ते पाहिले जात आहे, असे सांगितले. ही गिरणी ६५ टन इतक्या ज्यूट उत्पादनाची होती व सुमारे १५०० कामगार तेथे काम करीत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in