गोवंडीतील आगीत भंगाराचे गाळे खाक

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.
गोवंडीतील आगीत भंगाराचे गाळे खाक

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुर्ला (प.) येथे आगीची घटना घडून त्यामध्ये लाकडी वखारीला लागलेल्या आगीत १०-१५ गाळे जळून खाक झाले. ही घटना ताजी असताच मंगळवारी दुसऱ्या दिवशी गोवंडी, झाकीर हुसैन नगर येथील झोपडपट्टी परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागून भंगार सामानाचे चार ते पाच गाळे जळून खाक झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली. गोवंडी, झाकीर हुसेन नगर, वस्ती शौचालय, येथे मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास झोपडपट्टीत १५० चौ. फूट ×१०० चौ.फूट जागेत बैठ्या गाळ्यांना आग लागल्याची घटना घडली. या आगीत गाळयातील भंगार सामान, इलेक्ट्रिक वायरिंग, उपकरणे, कार्डबोर्ड व पेपरचा साठा आदी सामान जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in