मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पाच वाहनांचा विचित्र अपघात ; कार चालकासह महिलेचा जागीच मृत्यू
राज्यात अपघातांचं प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एक मोठा अपघात झाला अून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर विरुद्ध बाजूच्या लेनवर पलटी झाल्याने पाच वाहनांचा विचित्र झाला. यात कारचालक आणि महिलेचा मृत्यू झाला असून तर कारमधील इतर दोन महिला गंभी जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारा कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर शेजारच्या लेवर जाऊन पलटी झाला. यावेळी समोरुन येणारी पाच वाहन कंटेनरला धडकली. यात एका कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात कार चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील दोन महिलांना दुखापत झाली आहे. त्यांना कामोठी येथील एमजीएम रुग्णालात उपचारासाठी दाखल केलं आहे. या अपघातामुळे मुंबई-पुणे एस्क्प्रेस वेच्या मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.