राज्यातून चोरीच्या मोबाईलची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते
 राज्यातून चोरीच्या मोबाईलची विक्री करणाऱ्या  टोळीचा पर्दाफाश

मुंबईसह इतर राज्यातून चोरी केलेल्या मोबाइलची विक्री करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या चेंबूर युनिटच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना मानखुर्द येथून पोलिसांनी अटक केली आहे. मेहबूब खान आणि फियाज अकबर शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मानखुर्द महाराष्ट्रनगर, चिता कॅम्पचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांकडून पोलिसांनी ४१ अॅपल कंपनीच्या स्मार्टफोनसह ४९० नामांकित कंपन्याचे मोबाइल, एक लॅपटॉप, एक हिटरगन, ९ किलो ५९० ग्रॅम वजनाचा गांजा, दोन तलवारी, देशी-विदेशी मद्याच्या १७४ बाटल्या, असा ७४ लाख ७८ हजार ५२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई शहरात मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्यानंतर वरिष्ठांनी सर्वच पोलीस ठाण्यांना तसेच गुन्हे शाखेला अशा मोबाइलचोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे व त्यांच्या पथकाने अशा आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान पोलीस शिपाई संभाजी विठ्ठल कोलेकर यांना मानखुर्द परिसरात राहणारा एक व्यक्ती चोरीचे मोबाइल खरेदी करून त्याचे आयएमईआय बदलून त्या मोबाइलची इतर राज्यांत विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in