वांद्रे येथील समुद्रात मुलगी बुडाली

महिलेचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले
वांद्रे येथील समुद्रात मुलगी बुडाली

मुंबई : रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटक आनंद घेण्यासाठी वांद्रे येथील समुद्रात गेले होते; मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ज्योती सोनार (२७) मुलगी समुद्रात बुडाली. मुलीला समुद्रात बुडताना पाहून तेथे उपस्थित व्यक्तींनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलाला घटनेबाबत कळवले. त्यानुसार अग्निशमन दलाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. ज्योती सोनार अशी महिलेची ओळख पटली असून, तिचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील किल्ल्याजवळ सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशीपर्यंत शोध कार्य सुरू होते, पण पावसाळ्यामुळे समुद्र खवळला असल्याने महिलेचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in