आरे वसाहतीमधील वृक्षतोडीविरोधात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार

आरे वसाहतीमधील वृक्षतोडीविरोधात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार

कारशेडच्या जागेत अवैध वृक्षतोड केल्याचा आरोप करीत पर्यावरणप्रेमींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ची कारशेड आणि आरे वसाहतीमधील वृक्षतोडीविरोधातील याचिकांवर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांनी वृक्षतोड, तसेच कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

आरे वसाहतीमधील कामावरील बंदी उठविल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा, तसेच कारशेडच्या जागेत अवैध वृक्षतोड केल्याचा आरोप करीत पर्यावरणप्रेमींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आरेमधील कारशेडसंदर्भातील सर्व याचिकांवर ५ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. यावेळी पुढील सुनावणीपर्यंत आरेतील एकाही झाडाला हात लावू नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याच वेळी एमएमआरसीएलने कारशेडमधील एकही झाड कापले नसून, केवळ गवत आणि झुडपे कापल्याचे न्यायालयाला सांगितले होते. मात्र त्यांच्या या स्पष्टीकरणा बाबत याचिकाकर्ते, पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत आक्षेप घेतला आहे. २०१९मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कार्यरत असताना आरेतील झाडांची मध्यरात्री कत्तल करण्यात आली होती. तेव्हापासून पर्यावरणप्रेमी येथील कारशेडला कठोर विरोध दर्शवत आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in