मोबाईलवरील वादातून पतीकडून पत्नीवर हातोड्याने हल्ला

मोबाईलवरून झालेल्या वादातून पतीने पत्नीवर हातोड्याने हल्ला केल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. या हल्ल्यात अनिता विजय शर्मा ही महिला गंभीररीत्या जखमी झाली...
मोबाईलवरील वादातून पतीकडून पत्नीवर हातोड्याने हल्ला

मुंबई : मोबाईलवरून झालेल्या वादातून पतीने पत्नीवर हातोड्याने हल्ला केल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. या हल्ल्यात अनिता विजय शर्मा ही महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तिचा पती विजय शर्मा याच्याविरुद्ध कुर्ला पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री तीन वाजता कुर्ला येथील गरीबमुल्ला चाळ, साईनाथनगरमध्ये घडली. विजयला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यातून तो अनिताच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

क्षुल्लक कारणावरून तिला शिवीगाळ करून सतत मारहाण करत होता. रविवारी सायंकाळी सात वाजता विजयने अनिताकडे मोबाईल घेण्यासाठी पैशांची मागणी केली. यावेळी तिने पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात याच कारणावरून भांडण झाले होते. पहाटे तीन वाजता त्याने घरातील लोखंडी हातोड्याने तिच्या डोक्यावर हल्ला केला. त्यानंतर तो हातोडा तिथेच टाकून पळून गेला होता. ही माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनिताची जबानी नोंदवून घेतली होती.

logo
marathi.freepressjournal.in