शस्त्रांचा धाक दाखवून दागिने बनवण्याचा कारखानाच लुटला ;दुकलीस अटक

तपासादरम्यान या दोघांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यांच्याकडून चोरीचे काही दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
शस्त्रांचा धाक दाखवून दागिने बनवण्याचा कारखानाच लुटला ;दुकलीस अटक

मुंबई : काळबादेवी येथील एका सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यात घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार करून पळून गेलेल्या दोन आरोपींना एल. टी. मार्ग पोलिसांनी अटक केली. राजेश बौद्धू राय आणि वसंत राजू दादअण्णा पेल्ली ऊर्फ चिट्टू अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून चोरीचा काही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

९ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता काळबादेवी येथील एका सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारखान्यात रॉबरी झाली होती. कारखान्यात घुसलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने घातक शस्त्रांचा धाक दाखवून सुमारे साडेसात लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांनी राजेश राय याला रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली होती. त्याच्या चौकशीत वसंत पेल्ली याचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याला विरार येथून पोलिसांनी अटक केली.

तपासादरम्यान या दोघांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यांच्याकडून चोरीचे काही दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. याच गुन्ह्यांत राजेश न्यायालयीन तर वसंत हा पोलीस कोठडीत आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्याच्या चौकशीतून अशाच काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in