मुंबईतील मेट्रो रेलच्या सद्यस्थितीवर अश्विनी भिडे यांचे व्याख्यान

मुंबई मराठी पत्रकार संघातर्पेâ दरवर्षी ज्येष्ठ पत्रकार आप्पा पेंडसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते
मुंबईतील मेट्रो रेलच्या सद्यस्थितीवर अश्विनी भिडे यांचे व्याख्यान
PM

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्पेâ दरवर्षी ज्येष्ठ पत्रकार आप्पा पेंडसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. या व्याख्यानात प्रामुख्याने मुंबईच्या नागरी प्रश्नांना प्राधान्य दिले जाते. यावर्षी या व्याख्यानमालेतील पुष्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती अश्विनी भिडे गुंफणार आहेत. ‘मुंबईतील मेट्रोची सद्यस्थिती आणि भविष्यातील मेट्रोचे लोकांना होणारे फायदे’ या विषयावर श्रीमती अश्विनी भिडे यांचे व्याख्यान गुरुवार, दि. २८ डिसेंबर, २०२३ रोजी सायं. ४.३० वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, बाळशास्त्री जांभेकर चौक, आझाद मैदान, मुंबई - ४०० ००१ येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in