सार्वजनिक गणेश मंडळांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

त्याच बरोबर ज्या गणेश मंडळांचे मागील वर्षाचे शुल्क व अनामत रक्कम बाकी आहे, त्यांना ती पुढील सात दिवसांच्या आत परत केली जाणार आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

गणेश भक्तांसाठी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यंदा मुंबईत महानगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आकारले जाणारे शुल्क माफ करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्याच बरोबर ज्या गणेश मंडळांचे मागील वर्षाचे शुल्क व अनामत रक्कम बाकी आहे, त्यांना ती पुढील सात दिवसांच्या आत परत केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सांगितले आहे. या निर्णयाच्या अंबलबजावणीला तात्काळ सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

घरगुती स्तरावर पर्यावरणपूरक गणेशमुर्ती अनिवार्य

मुंबईची ओखळ असणारा गणेशोत्सव अधिक पर्यावरपूरक होण्यासाठी मगापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यसाठी पालिकेकडून विविध उपक्रम देखील राबवले जातात. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले निर्देश तसेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश डोळ्यासमोर ठेवून उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यानुसार यंदा मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागात एक जागा शाडू मातीने गणपती बनवणाऱ्या कारागीरांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही जागा मुर्तिकारांना मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. महापालिका यासाठी मुर्तीकारांसाठी कोणतेही शुल्क आकारणार नाही, अशी माहिती आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहे. आज आजोजित बैठकीत याबाबतची माहिती देण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in