मुंबई : दादर कबुतरखाना येथील किर्तिकर मार्केट मध्ये शनिवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. काही वेळातच आग वाऱ्या सारखी पसरली आणि मुंबई अग्निशमन दलाने लेवल वनची आग घोषित केली. मध्यरात्रीची वेळ असल्याने मार्केटमध्ये वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून, तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून पुढील तपास स्थानिक पोलीस, पालिका अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी करीत आहेत.
दादर पश्चिम डिसिल्वा रोड कबुतरखाना येथील किर्तिकर मार्केटमध्ये शनिवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. मार्केटमधील दोन व्यावसायिक ब्लॉकमध्ये लागलेली ही आग काही क्षणात भडकली. लेवल वनची आग असल्याचे दलाने घोषित केले. मध्यरात्रीची वेळ असल्याने मार्केटमध्ये फारसी वर्दळ नव्हती. अग्निशमन दलाने पहाटे पावणे पाचच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. आगीच्या घटनेची चौकशी संबंधित यंत्रणेकडून केला जात असल्याचे सांगण्यात आले.