
मुंबई : पवई तलावाजवळ चंद्रशेखर हळदळकर (३९) या रिक्षा चालकाचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला. हा मृतदेह घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.
पोलिसांनी सांगितले की, चंद्रशेखर हळदणकर हे घाटकोपरच्या असल्फा येथील रहिवासी आहे. ते तीन दिवसांपासून बेपत्ता होते. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नव्हती. त्यांच्या शरीरावर कोणतीही खूण आढळली नाही. त्यांनी मद्यपान केले की नाही हे शवविच्छेदन अहवालातून कळणार आहे. ते अविवाहित होते तसेच त्यांना दारूचे व्यसन होते. तसेच ते वैफल्यग्रस्त होते.