मुंबईची कंपनी देतेय राम मंदिराला विजेपासून संरक्षण

कोणत्याही इमारतीवर पावसाळ्यात वीज पडून नुकसान होऊ नये, म्हणून विशेष संरक्षणाची गरज असते.
मुंबईची कंपनी देतेय राम मंदिराला विजेपासून संरक्षण
Published on

कोणत्याही इमारतीवर पावसाळ्यात वीज पडून नुकसान होऊ नये, म्हणून विशेष संरक्षणाची गरज असते. अनेक शतकांनंतर भारतात संपूर्ण दगडापासून उभा राहात असलेल्या अयोध्येतील राम मंदिरालाही हे संरक्षण गरजेचे होते. हे काम मुंबईतील जेईएफ ही कंपनी करत आहे.

जेईएफचे संस्थापक बी.जी. प्रशांत यांनी सांगितले की, अयोध्येतील राम मंदिराचे संरक्षण, ही महत्वाची बाब होती. त्यासाठी युरोपियन प्रयोगशाळेच्या मानकांनुसार चाचण्या घेण्यात आल्या. सुरुवातीला आम्हाला २०० किलो ॲम्पिअरपर्यंतच्या संरक्षणाची तरतूद करावी लागली. हीदेखील सामान्यपणे खूप जास्त होती. आपल्या वैदिक शास्त्रानुसार देव-देवतांशी संबंधित साहित्यात काही धातू वापरले जात नाहीत. आम्ही राम मंदिरासाठी वीज संरक्षण यंत्रणा उभारताना हे धातू टाळले. तरीही मंदिराचा कळस मात्र सोन्याचा आहे, त्यामुळे आमच्यापुढे आव्हान होतेच. त्याचीही व्यवस्था केली. मंदिर परिसरात आम्ही ३६ अर्थिंग पॉइंट उभारले आहेत. त्यामुळे वीज पडलीच तरी मंदिराला धोका पोहोचणार नाही.’

logo
marathi.freepressjournal.in