विजेचा खांब अंगावर पडून पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबई महानगरपालिकेच्या जी दक्षिण वॉर्डातील घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या ४२ वर्षीय शंकर गिलबिले यांचा उत्खनन यंत्राद्वारे मलबा काढत असताना विजेचा खांब अंगावर पडल्याने मृत्यू झाला. प्रभादेवी येथील एस. एल. मतकर मार्गावर अनधिकृत बांधकाम पाडत असताना ही घटना घडल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
विजेचा खांब अंगावर पडून पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जी दक्षिण वॉर्डातील घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या ४२ वर्षीय शंकर गिलबिले यांचा उत्खनन यंत्राद्वारे मलबा काढत असताना विजेचा खांब अंगावर पडल्याने मृत्यू झाला. प्रभादेवी येथील एस. एल. मतकर मार्गावर अनधिकृत बांधकाम पाडत असताना ही घटना घडल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

अनधिकृत बांधकामे पाडत असताना अनेक ठिकाणी या बांधकामाचा मलबा साचतो. हा मलबा काढण्यासाठी पालिकेचे कर्मचारी काम करत असतात. मलबा काढत असताना मलबा काढण्याच्या यंत्राने झाडाला धक्का लागला आणि झाड विजेच्या खांबावर कोसळून विजेचा खांब शंकर गिलबिले यांच्या अंगावर पडल्याचीमाहिती घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीने दिली. तर पालिका अधिकाऱ्याने ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in