पवई तलावात संगीत कारंजे उभारणार ; मुख्यमंत्र्याचे पालिकेला निर्देश

मुंबईचे सौंदर्यीकरण अंतर्गत पवई तलावात संगीत कारंजे उभारण्याबाबत लवकरच प्रक्रिया राबवण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले
पवई तलावात संगीत कारंजे उभारणार ; मुख्यमंत्र्याचे पालिकेला निर्देश

मुंबईचे सौंदर्यीकरण सुरू असून नागपूर येथील फुटाळ तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे उभारण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांना दिले आहेत. चांदिवली संघर्ष नगर येथे अद्ययावत रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे माया नगरी मुंबईत देशविदेशातील पर्यटकांचे रेलचेल असते. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकाधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई महापालिकेने पवई तलावात संगीत कारंजे उभारावे, असे निर्देश शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. मुंबईचे सौंदर्यीकरण अंतर्गत पवई तलावात संगीत कारंजे उभारण्याबाबत लवकरच प्रक्रिया राबवण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in