रे रोड स्थानकाबाहेर लवकरच नवीन पूल बांधण्यात येणार

रे रोड स्थानकाबाहेर पादचारी पूल उभारण्याची गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून मागणी केली जात होती.
रे रोड स्थानकाबाहेर लवकरच नवीन पूल बांधण्यात येणार

हार्बर मार्गावरील रे रोड स्थानकाबाहेर लवकरच नवीन पूल बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून, यासाठी पालिका तब्बल तीन कोटी ३८ लाख रुपये खर्चणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे रे रोड स्थानकात येणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय दूर होईल, अशी माहिती पूल विभागाने दिली आहे.

रे रोड स्थानकाबाहेर पादचारी पूल उभारण्याची गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून मागणी केली जात होती. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही पूल उभारण्याची मागणी करत पालिकेकडे पाठपुरावा केला होता. प्रशासनाने अखेर ही मागणी मान्य केली आहे. या प्रस्तावाला पालिका प्रशासकाकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. पालिकेने या पुलाच्या उभारणीसाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत नऊ कंत्राटदारांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी मे. शहा इंजिनीअरने हे काम २० टक्के कमी किमतीत करण्याची तयारी दर्शवली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in