मुंबर्इ : गेली तीन दशके मराठी, इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता करणारे व साहित्य, शास्त्र क्षेत्रात मुशाफीरी असलेले ज्येष्ठ पत्रकार दिनार पाठक यांनी सायन्स फिक्शन गटात मोडणारे पण विज्ञान-तंत्रज्ञानातील सत्त्य माहितीवर आधारित व्हायरस नावाचे पुस्तक लिहिले असून त्याचे प्रकाशन शनिवारी ठाण्यातील दादा कोंडके अॅम्फीथिएटरमध्ये भाजप मुंबर्इ अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न झाले. त्या प्रसंगी डोंबिवली फास्ट फेम दिग्दर्शक अभिनेते संदीप कुलकर्णी, प्रख्यात सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. गिरीश महाजन, अनघा प्रकाशनचे अमोल नाले आदि मान्यवर उपस्थित होते.
कोरोना महामारीनंतर व्हायरस हा शब्द प्रत्येकाच्या कानावर पडून प्रचलित झाला असला तरी त्याची खोलात जाउन माहिती घेण्याचे कष्ट फार कमी जणांनी घेतले असेल. व्हायरस कादंबरीच्या माध्यमातून अगदी काँगोचे जंगल आणि विमान तसेच व्हायरस याबाबत सामान्यजनाना नसलेली माहिती दिनार पाठक यांनी उपलब्ध करुन दिली आहे. अर्थातच त्यांच्या माहितीला सत्त्याची धार देण्याचे काम प्रख्यात सूक्ष्मजीव तज्ञ डॉ. गिरीश महाजन यांनी केले आहे. सर्वसामान्यांची व्हायरस बाबतची उत्सुकता पूर्ण होर्इल, अशी या कादंबरीची धाटणी आहे.