उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना दुखापत झाल्यास त्वरित प्राथमिक उपचारासाठी एक नवी उपययोजना

‘मेघा श्रेय’ या संस्थेच्या संस्थापक सीमा सिंग यांनी या प्रथमोपचार पेट्या सुपूर्द केल्या
उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना दुखापत झाल्यास त्वरित प्राथमिक उपचारासाठी एक नवी उपययोजना

मुंबई महापालिकेच्या उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना दुखापत झाल्यास त्वरित प्राथमिक उपचार मिळावे या उद्देशाने प्रथमोपचार पेटींची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी ‘मेघा श्रेय’ या संस्थेच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ३०० प्रथमोपचार पेट्या देण्यात आल्या आहेत.

महानगरपालिका मुख्यालयात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांची बुधवारी भेट घेऊन ‘मेघा श्रेय’ या संस्थेच्या संस्थापक सीमा सिंग यांनी या प्रथमोपचार पेट्या सुपूर्द केल्या. यावेळी उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या उद्यान विभागामार्फत सामाजिक दायित्‍वाच्‍या माध्‍यमातून विविध उपक्रम उद्यानांमध्‍ये राबविले जातात. उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांना अथवा मुलांना क्वचितप्रसंगी दुखापत झाल्यास त्यांना प्राथमिक उपचार तात्काळ उपलब्ध व्हावेत, या हेतूने ‘मेघा श्रेय’ संस्थेने उद्यान विभागाला प्रथमोपचार पेट्या (फर्स्ट ऐड किट्स) प्रदान केल्याचे परदेशी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in