बाईकला धडक लागून नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

अपघातानंतर जखमींना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना माहिती न देता पळून गेलेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे.
बाईकला धडक लागून नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Published on

मुंबई : अज्ञात वाहनाची बाईकला धडक लागून झालेल्या अपघातात श्रीयांग गणेश वानरकर या नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर त्याची आई सुचिता गणेश वानरकर ही गंभीररीत्या जखमी झाली. सुचितावर शांतीनिकेतन रुग्णालयात उपचार सुरू असून, ती सध्या दादर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अपघाताची नोंद करुन अपघातानंतर जखमींना कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना माहिती न देता पळून गेलेल्या अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे. सुचिताची आई गावी जात असल्याने रविवारी दुपारी ती श्रीयांगसोबत तिच्या बाईकवरुन भांडुपला जात होती. ही बाईक पूर्व दुतग्रती महामार्ग, घाटकोपर वाहतूक विभाग चौकीवरील ब्रिजवरुन जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांच्या बाईकला धडक दिली. त्यात सुचिता व तिचा मुलगा श्रीयांग हे दोघेही जखमी झाले होते. या दोघांनाही झायानोव्हा रुग्णालयात दाखल केले असता, तिथे श्रीयांगला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर सुचिता यांना पुढील उपचारासाठी शांतीनिकेतन रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in