रस्तेकाम रखडवणाऱ्या कंपनीकडून लवकरच करवसुली; सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याकडे कंत्राटदारांची पाठ

उच्च न्यायालयानेही दंड वसूल करू नये, असे म्हटलेले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराची सुरक्षा अनामत रक्कम आणि बँक गॅरंटीची रक्कम आहे. पालिकेकडे सुरक्षा अनामत रक्कम असल्याने कंत्राट किमतीच्या तुलनेत ही रक्कम कमी असली तरी वसूल करण्यात अडचण येणार नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
रस्तेकाम रखडवणाऱ्या कंपनीकडून लवकरच करवसुली; सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याकडे कंत्राटदारांची पाठ

मुंबई : मुंबई शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचे आदेश निघाले. पण अद्याप मुंबईकरांना सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवरून प्रवास करता आलेला नाही. हे रस्तेकाम रखडवणाऱ्या मेसर्स रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंत्राटदाराकडून लवकरच ६४.६० कोटींची दंडवसुली करण्‍यात येणार आहे. उच्च न्यायालयानेही दंड वसूल करू नये, असे म्हटलेले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराची सुरक्षा अनामत रक्कम आणि बँक गॅरंटीची रक्कम आहे. पालिकेकडे सुरक्षा अनामत रक्कम असल्याने कंत्राट किमतीच्या तुलनेत ही रक्कम कमी असली तरी वसूल करण्यात अडचण येणार नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने ६००० कोटींच्या निविदा मागवल्या आणि जानेवारी २०२३ मध्ये शहर व दोन्ही उपनगरातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याची वर्क ऑर्डर दिली. पूर्व व पश्चिम उपनगरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्तेकामाला सुरुवात झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in