दहा हजाराची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक

या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी त्याने त्यांच्याकडे २० हजाराची लाचेची मागणी केली होती.
दहा हजाराची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक

मुंबई : १० हजाराची लाच घेताना मानखुर्द पोलीस ठाण्याचा पोलीस शिपाई प्रदीप राजाराम फडतरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. २७ नोव्हेंबरला तक्रारदार हा त्याच्या मित्रासोबत मानखुर्द येथील देशी बारमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेले होते. यावेळी तक्रारदाराच्या मित्राचे बार मॅनेजरसोबत वाद झाला होता. या वादात तक्रारदारांनी मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी पोलीस शिपाई प्रदीप फडतरे याने तक्रारदाराला कॉल करून पोलीस ठाण्यात बोलावले. बार मॅनेजरने तक्रार केली असून त्यांना मोठ्या केसमध्ये अडविणार असल्याची धमकी दिली होती. या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी त्याने त्यांच्याकडे २० हजाराची लाचेची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी लाच देण्याची तयारी दर्शवून प्रदीप फडतरे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. ठरल्याप्रमाणे तक्रारदार दहा हजार रुपये घेऊन गेले होते. यावेळी लाचेची ही रक्कम घेताना प्रदीप फडतरे याला या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in