पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिसाला मारहाण; आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा

स्वप्निल कातुरे हे भोईवाडा येथे राहत असून, रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. शुक्रवारी दुपारी सव्वाबारा वाजता जान्जेब हा २३ वर्षांचा तरुण पोलीस ठाण्यात आला होता. रेल्वे प्रवासादरम्यान त्याचा मोबाईल चोरीस गेला होता. त्याची तक्रार करण्यासाठी तो तिथे आला होता; मात्र पोलिसांनी त्याला वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला.
पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिसाला मारहाण; आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा

मुंबई : पोलीस ठाण्यात गोंधळ घालून एका तरुणाने पोलिसांनाच मारहाण करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात घडला. याप्रकरणी जान्जेब सलीम खान या आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

स्वप्निल कातुरे हे भोईवाडा येथे राहत असून, रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. शुक्रवारी दुपारी सव्वाबारा वाजता जान्जेब हा २३ वर्षांचा तरुण पोलीस ठाण्यात आला होता. रेल्वे प्रवासादरम्यान त्याचा मोबाईल चोरीस गेला होता. त्याची तक्रार करण्यासाठी तो तिथे आला होता. मात्र पोलिसांनी त्याला वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तो पोलीस ठाण्यातून निघून गेला. काही वेळानंतर तो पुन्हा पोलीस ठाण्यात आला आणि त्याने पोलिसांना त्याची तक्रार दाखल करण्यास सांगितले. यावेळी त्याने पोलीस ठाण्यात प्रचंड गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पोलिसांनी समजविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने माझा मोबाईल शोधून दिला नाही तर तुमची वाटच लावतो, अशी धमकी देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी स्वप्नील कातुरे यांच्याशी वाद घालून त्यांच्या नाकावर जोरात ठोसा लगावला. स्वत:चे डोके टेबलावर आपटून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. डोक्याला दुखापत झाल्याने त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकारानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in