श्रीमंत देश म्हणजे विकसित राष्ट्र नव्हे; भारत तिसरी अर्थव्यवस्था बनला तरी गरीबच - सुब्बाराव

आरबीआयच्या माजी गव्हर्नरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा संदर्भ दिला. मोदी यांनी अनेकदा सांगितले आहे की, जर ते पुन्हा सत्तेवर आले तर भारत त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
श्रीमंत देश म्हणजे विकसित राष्ट्र नव्हे; भारत तिसरी अर्थव्यवस्था बनला तरी गरीबच - सुब्बाराव

मुंबई : भारत २०२९ पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला तरी भारत गरीब देश राहू शकतो, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी सोमवारी व्यक्त केले. त्यामुळे या विषयावर आनंदोत्सव साजरा करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले. सुब्बाराव यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सौदी अरेबियाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, श्रीमंत देश होणे म्हणजे विकसित राष्ट्र होणे नव्हे.

आरबीआयच्या माजी गव्हर्नरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा संदर्भ दिला. मोदी यांनी अनेकदा सांगितले आहे की, जर ते पुन्हा सत्तेवर आले तर भारत त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. अमेरिका आणि चीननंतर भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अनेक अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.

सुब्बाराव म्हणाले, मला वाटते की हे शक्य आहे (भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत आहे), पण ही काही आनंदाची गोष्ट नाही. कारण आपण एक मोठी अर्थव्यवस्था आहोत, कारण आपण १.४० अब्ज लोक आहोत आणि लोक उत्पादनाचा घटक आहेत. आपण एक मोठी अर्थव्यवस्था आहोत. कारण आमल्याकडे लोक आहेत. पण तरीही आपण गरीब देश आहोत. ते म्हणाले की, भारत आता जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

सुब्बाराव म्हणाले की, या बाबतीत भारत १३९ व्या क्रमांकावर आहे ज्याचे दरडोई उत्पन्न २,६०० डॉलर आहे. ब्रिक्स आणि जी-20 देशांमध्ये भारत सर्वात गरीब आहे. विकासदराला गती दिली पाहिजे आणि नफा सर्वांमध्ये वितरीत केला गेला पाहिजे. तरच भारताची प्रगती होईल.

सुब्बाराव यांनी पंतप्रधानांच्या त्या विधानाची आठवण करून दिली ज्यात ते म्हणाले होते की भारताला २०४७ पर्यंत विकसित देश बनायचे आहे. माजी सुब्बाराव यांच्या मते, विकसित राष्ट्र होण्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत - कायद्याचे राज्य, मजबूत राज्य, जबाबदारी आणि स्वतंत्र संस्था महत्त्वाच्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in