सुट्ट्या पैशांनी केला वृद्धाचा घात; आरोपी रिक्षाचालकाला पाच वर्षे तुरुंगवास

सत्र न्यायाधीश डी. जी. ढोबळे यांनी रिक्षाचालकाला रामप्रवेश चौहान याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून पाच वर्षे तुरुंगवास ठोठावला.
सुट्ट्या पैशांनी केला वृद्धाचा घात; आरोपी रिक्षाचालकाला पाच वर्षे तुरुंगवास

मुंबई : दोन रुपयांच्या सुट्ट्या पैशांवरून झालेल्या वादात वृद्ध प्रवाशाची हत्या करणाऱ्या रिक्षाचालकाला दिंडोशी सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला. सत्र न्यायाधीश डी. जी. ढोबळे यांनी रिक्षाचालकाला रामप्रवेश चौहान याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून पाच वर्षे तुरुंगवास ठोठावला.

आठ वर्षांपूर्वी १४ एप्रिल २०१६ रोजी भगवती रुग्णालयाजवळील निवासी इमारतीत रात्रपाळीची ड्युटी केल्यानंतर वृद्ध सुरक्षारक्षक घरी रिक्षाने बोरिवली पश्चिम येथे आला. शेअर रिक्षाचे भाडे प्रत्येकी १८ रुपये होते, तर वृद्धाने रिक्षाचालकाला २० रुपये दिले होते. यावेळी दोन रुपये सुट्टे न दिल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादामध्ये २४ वर्षीय रामप्रवेशने धक्काबुक्की केली असता, वृद्ध खाली कोसळला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सत्र न्यायाधीश डी. जी. ढोबळे यांनी रामप्रवेशला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले आणि पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठेाठावली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in