समुद्रकिनारी सर्च लाइट बसवण्यात येणार; विसर्जनस्थळी १३ ठिकाणी विद्युत मनोरे

मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रत्येक सण नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले
 समुद्रकिनारी सर्च लाइट बसवण्यात येणार; विसर्जनस्थळी १३ ठिकाणी विद्युत मनोरे

विसर्जनस्थळी आपत्कालीन परिस्थितीत जीवरक्षकांना वेळीच मदत उपलब्ध व्हावी, यासाठी समुद्रकिनारी सर्च लाइट बसवण्यात येणार आहेत. तसेच विसर्जनस्थळी विद्युत मनोरे उभारण्यात आले असून गणेशोत्सव मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वीज ग्राहक विभागात एक खिडकी योजना सुरू केली असून यंदाच्या गणेशोत्सवासाठी बेस्ट उपक्रमाने जय्यत तयारी केली आहे.

मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रत्येक सण नियमांच्या चौकटीत राहून साजरे करावे लागले. यंदा कोरोनाचा धोका कमी असल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. बेस्टच्या विद्युत विभागाने मिरवणूक मार्गावरील व विसर्जनस्थळा-वरील प्रकाश योजना योग्यरित्या उपलब्ध व्हावी, यासाठी योग्य ते नियोजन केले आहे. बेस्ट उपक्रमाने गणेशभक्तांसाठी ७१ मिरवणूक मार्ग २० विसर्जनस्थळे आणि ३८ कुत्रिम तलाव येथे २२१५ दिवे लावून प्रकाशयोजना केली आहे. विसर्जनस्थळांवर सुयोग्य प्रकाश व्यवस्थेकरिता एकूण १३ स्थायी विद्युत मनोऱ्यांची उभारणी केली आहे. तसेच मोठ्या गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विसर्जनस्थळांवर पर्यायी वीज पुरवठ्याकरिता एकूण ८ डिझेल जनित्र संचांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in