रस्ते देखभालीसाठी गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेची नियुक्ती

पालिकेच्या रस्तेविभागातील अभियंत्यांना दिलासा मिळाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
 रस्ते देखभालीसाठी गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेची नियुक्ती

रस्तेघोटाळा उघडकीस आल्यानंतर रस्तेकामासह देखभालीची जबाबदारी पालिकेच्या अभियत्यांवर सोपवण्यात आली होती; मात्र यापुढे रस्ते देखभालीसाठी गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या रस्तेविभागातील अभियंत्यांना दिलासा मिळाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून बाहेरील त्रयस्थ संस्थेची निवड केली जायची; परंतु रस्तेघोटाळ्यानंतर या संस्थांना बाहेरचा रस्ता दाखवून पुन्हा एकदा रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेची तपासणी करून देखरेख ठेवण्यासाठी पूर्णत: महापालिकेच्या अभियंत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून महापालिका अभियंत्यांच्या देखरेखीखालीच रस्त्यांची कामे केली जात होती; मात्र आता रस्ते देखभालीसह गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता या कामातून सर्व अभियंत्यांची सुटका झाली आहे.

पुढील तीन वर्षांकरिता सात परिमंडळांमध्ये आठ गुणवत्ता व्यवस्थापन संस्थांवर (क्यूएमए) रस्तेकामांच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे. यासाठी सुमारे ४५ कोटींचा खर्च या संस्थांवर सोपवला जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in