माऊंट मेरी देवीच्या जत्रेतील दुकानासाठी अल्प प्रतिसाद

दरम्यान, या प्रक्रियेतून मुंबई महापालिकेला ३० लाखांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.
माऊंट मेरी देवीच्या जत्रेतील दुकानासाठी अल्प प्रतिसाद

वांद्रे येथील माऊंट मेरी देवीच्या जत्रेत पूजेचे साहित्य विक्रीसाठी मुंबई महापालिकेनेही २० दुकाने तात्पुरत्या स्वरूपात देण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. सद्य:स्थितीत फक्त १० दुकानासाठी अर्ज प्राप्त झाले असून ६ सप्टेंबर रोजी पुन्हा लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यावेळी कोणी प्रतिसाद दिला नाही तर त्या दुकानांची जागा पालिका रिकामी करणार असल्याची माहिती एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली. विशेष म्हणजे, १० पैकी एका दुकानासाठी लिलाव प्रक्रियेत १ लाख १ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. दरम्यान, या प्रक्रियेतून मुंबई महापालिकेला ३० लाखांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

मात्र दरवर्षी सप्टेंबर महिन्यात भरते. यंदाही माऊंट मेरी देवीच्या जत्रेसाठी योग्य ते नियोजन केले आहे. माउंट मेरी जत्रेवेळी फेरीवाल्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते. यंदा ४२० जागा निश्चित करण्यात आल्या असून पूजेचे साहित्य विक्रीसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये २० दुकानांची जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करण्यात येते. २० पैकी १० दुकानांना प्रतिसाद मिळाला आहे. तसेच जत्रेत येणाऱ्या भक्तांना कुठलीही अडचण होऊ नये, यासाठी मुंबई अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, स्थानिक आमदार, खासदार व मुंबई महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त बैठका पार पडल्या आहेत.

वाहतूक पोलीस वाहतुकीचे योग्य ते नियोजन करत असून कुठला मार्ग बंद अथवा बदल करणे, यासाठी मंगळवारी पुन्हा एकदा पाहणी करणार आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ८० सीसीटीव्ही कॅमेरे, फिरते शौचालय, कचरा व्यवस्थापनाची सुविधा करण्यात येणार आहे.

- विनायक विसपुते, सहाय्यक आयुक्त

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in