हुशार महिलेने चोरापासून केला बचाव

महिलेने अज्ञान व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे
हुशार महिलेने चोरापासून केला बचाव

मुंबई: घरात चोर शिरल्यावर आपण घाबरतो. आपल्याला काय करावे हे कळत नाही. पण, बोरिवलीतील ५२ वर्षीय महिलेने आपली हुशारी वापरून चोराला पळवून लावले. घरात चोर शिरल्यावर तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न त्याने केला. प्रसंगावधान राखून या महिलेने त्याला आपण एड‌्सचे रुग्ण असल्याचे सांगितले. हे ऐकताच चोराची बोबडी वळली. त्याने तात्काळ धूम ठोकली.

गोराईतील सोसायटीत ही ५२ वर्षीय ३० वर्षांपासून राहते. तिचा मुलगा व सून हे परदेशात असतात. ती एकटीच राहते. विशेष म्हणजे ती इलेक्ट्रॉनिक्स दुकानात नोकरी करते.

१४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आवाजाने तिला जाग आली. एक २५ ते ३० वर्षाचा चोर तिच्या घरात शिरला. त्याने तिच्या तोंडावर रुमाल कोंबला. तिने विचारले, तु कोण आहेस? घरात कसा घुसला? अशी प्रश्नांची सरबत्ती तिने केली. ‘मी ड्रग ॲॅडिक्ट आहे, असे सांगून त्याने तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला.’ प्रसंगावधान राखून तिने आपल्याला एडस‌् झाल्याचे सांगून तिने उलटी केली. हे पाहताच चोर घाबरला आणि पळून गेला. त्यानंतर महिलेने मोबाईलवरून शेजाऱ्यांना बोलवले. ते तात्काळ तिच्या मदतीला आले. या महिलेने अज्ञान व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in