भरधाव कारची दुभाजकाला धडक ; आग लागल्याने २ भावांचा मृत्यू , ३ जण जखमी

मुंबईतील माटुंगा परिसरातील बीए रोडवर आज पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
भरधाव कारची दुभाजकाला धडक ; आग लागल्याने २ भावांचा मृत्यू , ३ जण जखमी

आज मुंबईत(Mumbai) एका कारला आग(Fire) लागल्याने दोन भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावर घटना घडली. या दुर्घटनेत अन्य तीन जण देखील गंभीररित्या जखमी झाले आहेत. मुंबईतील माटुंगा परिसरातील बीए रोडवर आज पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वाहनातील प्रवासी पार्टीकरुन जॉयराईडला जात असताना सीएनजी कार रस्ता दुभाजकाला धडकली. एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितलं की, कार दुभाजकाला धडकल्यानंतर कारला आग लागली. यावेळी प्रवाशांना बाहेर निघण्याची देखील संधी मिळाली नाही. स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या दुर्घटनेत प्रेम वाघेला(१८) अजय वाघेला(२०) या दोन्ही भावांचा मृत्चू झाला आहे. सायन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कारमधील सर्व प्रवासी मानखुर्द उपनगरातील रहिवासी आहेत. दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्हला ते पार्टीनंतर जॉयराईडसाठी जात होते. यावेळी कार दुभाजकला धडकल्याने अपघात होवून कारला आग लागली. कारच्या डाव्या बाजूच्या दरवाजे लॉक जाम झाल्याने प्रवाशांना गाडीच्या बाहेर पडता आलं नाही. यात हर्ष कदम(२०) हा ६० ते ७० टक्के भाजला असून दुसरा प्रवासी हितेश भोईल (२५) आणि चालक कुणाल अत्तार (२५) यांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी होहचवून आगीवर नियंत्रण निळवलं. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in