धारावी पुनर्विकासाला गती! पहिल्याच दिवशी १५० घरांचे सर्वेक्षण

धारावी पुनर्विकासात घरांचे सर्वेक्षण सुरू केले असून यात झोपडपट्टीधारक अपात्र ठरणार, असा आरोप धारावी बचाव आंदोलन समितीने केला आहे.
धारावी पुनर्विकासाला गती! पहिल्याच दिवशी १५० घरांचे सर्वेक्षण

मुंबई : धारावीच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी धारावीतील घरांचे सोमवार, १८ मार्चपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी तब्बल १५० घरांचे सर्वेक्षण झाल्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून सांगण्यात आले. दरम्यान, धारावी पुनर्विकासात घरांचे सर्वेक्षण सुरू केले असून यात झोपडपट्टीधारक अपात्र ठरणार, असा आरोप धारावी बचाव आंदोलन समितीने केला आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात येणारे हे सर्वेक्षण जगातील सर्वात मोठ्या नागरी पुनरुज्जीवन प्रकल्पांपैकी एक असून मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी हे पहिले पाऊल आहे. मुंबई शहरांतर्गत धारावीला जागतिक दर्जाच्या शहरामध्ये रूपांतरित करण्याची ही सुरुवात आहे. या उपक्रमात सर्व धारावीकरांनी सहभागी होऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन डीआरपीपीएलने केले आहे.

या सर्वेक्षणाला कमला रमण नगर येथून प्रारंभ झाला. प्रत्येक अनौपचारिक सदनिकांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येत आहे. संबंधित गल्लीचे लेसर मॅपिंग करण्यात आले. त्यानंतर कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी एक प्रशिक्षित टीम स्वदेशी विकसित केलेल्या ॲॅपसह प्रत्येक सदनिकेला भेट दिली.

टोल फ्री क्रमांकावर समस्यांचे निवारण!

धारावीकरांच्या प्रश्नांना आणि समस्यांना उत्तर देण्यासाठी १८००२६८८८८८ हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in