लोअर परळ येते इमारतीला भीषण आग ; प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली

लोअर परळ येथील कस्तूरबा गांधी रोड येथील शिवतेज नावाच्या रहिवासी इमारतीला ही आग लागली आहे
लोअर परळ येते इमारतीला भीषण आग ; प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली
Hp
Published on

मुंबईतील लोअर परळ येथे एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. लोअर परळ येथील कस्तूरबा गांधी रोड येथील शिवतेज नावाच्या रहिवासी इमारतीला ही आग लागली आहे. या रहिवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील प्लॅटला ही आग लागली आहे. यात संपूर्ण फ्लॅट जळू खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशम दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

या आगीच्या भडक्यात फ्लॅट जळून खाक झाला आहे. ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेनंतर संपूर्ण इमारत तात्काळ खाली करण्यात आली. वेळीच प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी टळली आहे. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असून या ठिकाणी आजूबाजूला अनेक रहिवासी इमारती आहेत. यामुळे आग लागल्याच्या घटनेने परिसरात घळबळ उडाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in