ओमायक्रॉनचा मुंबईत वाढता प्रादुर्भाव,मुंबईत एकूण २३८ रुग्ण अढळले

जिनोम सिक्वेंसिंगतर्फे कोरोनाशी निगडीत सर्व बाबींचा तपशील तयार केला जातो
ओमायक्रॉनचा मुंबईत वाढता प्रादुर्भाव,मुंबईत एकूण २३८ रुग्ण अढळले
Published on

कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव मुंबईत दिवसेंदिवस वाढतच आहे. जिनोम सिक्वेंसिंगच्या १३व्या फेरीचा अहवाल सोमवारी जाहीर करण्यात आला असून मुंबईतील २६९ नमुन्यांची तपासणी केली असता तब्बल २६८ रुग्ण (९९.६३%) ओमायक्रॉनचे असल्याचे अहवालाद्वारे समोर आले आहे. यांपैकी १२ रुग्ण बीए ४, बीए ५ या व्हेरिएंटचे असल्याचे समजते.

जिनोम सिक्वेंसिंगतर्फे कोरोनाशी निगडीत सर्व बाबींचा तपशील तयार केला जातो. यावेळी १३व्या फेरीत एकूण ३६७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २६९ नमुने हे महानगरपालिका क्षेत्रातील होते. तर उर्वरित नमुने हे मुंबई महानगर क्षेत्राबाहेरील होते. २६८ बाधित रुग्णांपैकी बीए ४चे ६, तर बीए ५ व्हेरिएंटचे ६ रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण ३ ते १६ जून २०२२ या कालावधीतील असून यामध्ये १६ वर्षांची मुलगी, २ पुरुष, २ महिला आणि ८० वर्षांवरील सात जण आहेत.

logo
marathi.freepressjournal.in