वाहतूक पोलीस हवालदाराला मारहाण

कारवाईदरम्यान पळून गेल्याने त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत
वाहतूक पोलीस हवालदाराला मारहाण

मुंबई : शीव येथील षन्मुखानंद हॉलसमोर पार्किगसाठी अनधिकृतपणे पैसे घेऊन वाहनचालकाची फसवणूक करणाऱ्या तरुणांवर कारवाईसाठी गेलेल्या एका वाहतूक पोलीस हवालदारालाच तिघांनी धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी तिघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत नंतर कैलास सुरेश खंदारे या २२ वर्षांच्या तरुणाला माटुंगा पोलिसांनी अटक केली, तर पळून गेलेल्या त्याच्या दोन साथीदारांचा आता पोलीस शोध घेत आहेत. नितीन सुदाम पंदरकर हे शीव येथील षन्मुखानंद हॉलसमोर येथे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत तिथे गेले होते.

यावेळी तिथे कैलास हा त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत अनधिकृतपणे पार्किंगसाठी पैसे घेत असल्याचे दिसून आले. याच दरम्यान तिथे त्याचे दोन सहकारी आले. या दोघांनी त्यांच्याशी हुज्जत तसेच शाब्दिक बाचाबाची केली. त्यानंतर त्यांना धक्काबुक्कीसह मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी नितीन पंदरकर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच कैलासला पोलिसांनी अटक केली. त्याचे दोन्ही सहकारी कारवाईदरम्यान पळून गेल्याने त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in