नवरात्रोत्सवात खड्डे नऊ रंगांने भरण्याचा अनोखा उपक्रम

नवरात्रोत्सवात खड्डे नऊ रंगांने भरण्याचा अनोखा उपक्रम

मुंबईत नवरात्रोत्सवाची धूम असून नऊ दिवसांत वेगवेगळ्या नऊ रंगांचे कपडे महिला प्रामुख्याने प्रधान करतात

कोट्यवधी रुपये खर्चूनही मुंबईतील रस्ते खड्ड्यात असल्याने नवरात्रोत्सवात खड्डे नऊ रंगांने भरण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांच्या वेगवेगळ्या रंगांनी खड्डे भरण्यासाठी पॉटहोल्स वॉरियर्स फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.

मुंबईत नवरात्रोत्सवाची धूम असून नऊ दिवसांत वेगवेगळ्या नऊ रंगांचे कपडे महिला प्रामुख्याने प्रधान करतात. मात्र यंदाचा नवरात्रोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय फाऊंडेशने घेतला आहे. रस्त्यावरील खड्डे प्रत्येक दिवसाच्या रंगानुसार रंगवण्यात येणार आहेत. सोमवारी पहिल्या दिवशी पांढऱ्या रंगाचा वापर करत अंधेरी येथे रस्त्यावरील खड्डे हे पांढऱ्या रंगाने रंगवण्यात आल्याची माहिती पॉटहोल फाऊंडेशनचे संस्थापक मुश्ताक अन्सारी यांनी दिली. येत्या काळात मुंबईच्या रस्त्यावर अशाच पद्धतीने दररोज नवरात्रीच्या रंगाने हे खड्डे बुजवण्यात येतील, अशीही माहिती त्यांनी दिली. पहिल्या दिवशी काही खड्डे भरताना त्याठिकाणी पांढरा रंग टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील खड्डे रंगवताना त्याठिकाणी मदतीचेही आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in