रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीला धावणारे मंडळ, परळच्या नवचैतन्य बालसेवा मंडळाचे अनोखे सेवाकार्य

केईएम, वाडिया, टाटा कर्करोग अशी अनेक महत्त्वाची आणि सार्वजनिक रुग्णालये परळ परिसरात आहेत. देशभरातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्यामुळे येथे येत असतात.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीला धावणारे मंडळ, परळच्या नवचैतन्य बालसेवा मंडळाचे अनोखे सेवाकार्य
Published on

शिरीष पवार/मुंबई

केईएम, वाडिया, टाटा कर्करोग अशी अनेक महत्त्वाची आणि सार्वजनिक रुग्णालये परळ परिसरात आहेत. देशभरातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्यामुळे येथे येत असतात. अगदी गरीब व हलाखीच्या परिस्थितीमुळे पदपथावरच हे नातेवाईक राहत असतात. अशा लोकांना धान्य व इतर मदत, रुग्णांना आजारपणातील प्रवासात लागणाऱ्या वस्तूंचे वाटप परळच्या कवचैतन्य बालसेवा मंडळामार्फत जाऊ नये, किंबहुना एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला समजता नये, अशीच मंडळाची मनोभूमिका असल्याचे मंडळाचे कार्यकर्ते पांडुरंग तोरसकर यांनी सांगितले.

लालबाग, परळमधील गणेशोत्सव जगप्रसिद्ध झाला असला तरी त्याला आता पूर्णतः व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. अशाही परिस्थितीत काही मंडळांनी आपले सण-उत्सव पारंपरिक पद्धतीनेच साजरे करण्यावर भर दिला आहे. एकीकडे गणपतीच्या मूर्तीची उंची वाढत जात ४०-४० फुटांपर्यंत पोहोचली आहे. दुसरीकडे कुणी मंडळाचे नाव बदलत आहे, तर कुणी नेतेमंडळी, कलाकारांना आमंत्रित करीत आहे. अशा या चढाओढीच्या वातावरणात या साऱ्याला अपवाद ठरले आहे ते परळमधील नवचैतन्य बालसेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. कृष्णा बिल्डिंग नंबर ४, गोखले सोसायटी क्रॉस लेन, परळ येथील हे मंडळ गेली ७३ वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करीत आहे. स्थापनेपासून गणेशाच्या मूर्तीची उंची दीड फुटाच्या वर गेलेली नाही, हे मंडळाचे आगळे गुणवैशिष्ट्य. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा वगैरे न करता छोट्या जागेत अकरा दिवस सर्व धार्मिक विधी पार पाडले जात आहेत.

रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीला धावणारे मंडळ, परळच्या नवचैतन्य बालसेवा मंडळाचे अनोखे सेवाकार्य
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा आणि जिंका मोठी बक्षिसे

अनंतचतुर्थी दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. किमान ८०० ते १००० लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात. पण कुठेही गडबड- गोंधळ नसतो. विसर्जनाची मिरवणूकही शांततेत पार पडते. निमिष नायक संस्थेचे अध्यक्ष असून सुशांत सावळ सचिव आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची वाटचाल माणुसकीच्या वाहते सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in