गावदेवीत नोकराकडून २७ लाखांच्या घड्याळाची चोरी

गावदेवी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करुन पळून गेलेल्या मुरारी शालिग्राम चंद्रवंशी या नोकराचा शोध सुरू केला आहे
गावदेवीत नोकराकडून २७ लाखांच्या घड्याळाची चोरी

मुंबई : गावदेवी येथे राहणाऱ्या गुंतवणूक व्यावसायिकाच्या घरातून त्यांच्याच नोकराने सुमारे २७ लाखांचे महागडे घड्याळ चोरी करून पलायन केले. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करुन पळून गेलेल्या मुरारी शालिग्राम चंद्रवंशी या नोकराचा शोध सुरू केला आहे. तक्रारदाराला त्याच्या आईने वाढदिवसानिमित्त पटेक फिलिप कंपनीचे २७ लाखांचे घड्याळ भेट दिले होते. मुरारी हे त्यांच्याकडे आचारी म्हणून काम करतात. तक्रारदार आराम करत असताना, त्यांच्या बेडरूममध्ये असलेले घड्याळ नोकराने लांबवले. नोकरावर संशय बळावल्याने याबाबत त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली. अखेर सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिल्यानंतर मुरारीने बिल्डिंगखाली एकाला बोलावून त्याच्याकडे हे घड्याळ सुपूर्द केल्याचे दिसत आहे. पोलिसांनी मुरारीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला आहे

logo
marathi.freepressjournal.in