संगीत रसिकांसाठी आठवड्याला संगीत महोत्सव; उद्यानात नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन

वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्यानात मोफत वाचनालय संकल्पना राबवण्यात येत आहे.
संगीत रसिकांसाठी आठवड्याला संगीत महोत्सव; उद्यानात नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : संगीताची आवड प्रत्येकाला आहे. नवोदित कलाकारांना संगीताची आवड निर्माण व्हावी, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, मुंबईकर नागरिकांना पालिकेच्या उद्यानात येण्याची ओढ निर्माण व्हावी, यासाठी पालिकेच्या विविध उद्यानात संगीत महोत्सवाचे दर आठवड्याला आयोजन केले जाते. २४ व २५ फेब्रुवारीला पवई येथील पंडित दिनदयाल उपाध्याय उद्यान तथा ‘अॅम्बोशिया गार्डन’ येथे ‘नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ यांच्यामार्फत ‘एनसीपीए ॲॅट द पार्क’चे आयोजन केले होते. संगीत महोत्सवाला तरुण पिढीसह मुंबईकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्यानात मोफत वाचनालय संकल्पना राबवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आता पालिकेच्या उद्यानात संगीतप्रेमींसह मुंबईकरांसाठी दर आठवड्याला संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. बृहन्मुंबई महानगरपालिका एस विभाग पवई येथील ‘पंडित दिनदयाल उपाध्याय उद्यान तथा ‘ॲम्बोशिया गार्डन’ येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी एनसीपीए यांच्यामार्फत ‘एनसीपीए ॲॅट द पार्क’ हा संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्वांसाठी नि:शुल्क होता. नागरिकांचा उद्यानातील वावर वाढवा व नवोदित कलाकारांना एक हक्काचा मंच मिळावा, यासाठी निसर्गाच्या सानिध्यात वीकेंडला सायंकाळी संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात येतो, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in