साक्षीदाराला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी
मुंबई - साक्षीदाराला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी छोटा शकीलशी संबंधित रियाज भाटीविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदार खार परिसरात राहतो. दोन वर्षांपूर्वी रियाज भाटीसह इतर आरोपींविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी खंडणीसह पिटा कलमांतर्गत एका गुन्ह्यांची नोंद केली होती. याच गुन्ह्यांत तक्रारदार हे प्रमुख साक्षीदार आहेत. त्याने त्यांच्याविरुद्ध साक्ष देऊ नये म्हणून रियाज भाटीकडून त्यांना सतत शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली जात होती. जून २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत रियाजने अनेकांना धमकी दिल्याचे तक्रारदाराने त्यांच्या जबानीत म्हटले आहे. त्यांनी कोर्टात जाऊ नये, त्यांच्याविरुद्ध साक्ष देऊ नये. साक्ष दिली तर त्यांच्या बाजूने बोलावे यासाठी त्यांना धमकी दिली जात होती. सतत येणाऱ्या धमकीनंतर त्यांनी खार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रियाजविरुद्ध पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.