अंधेरीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

३२ वर्षांच्या आरोपीस अटक केली
अंधेरीत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
Published on

मुंबई : अंधेरी येथे ममता पंकज गुप्ता या ३१ वर्षांच्या महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून बालाजी श्रीमंत नागिमे या ३२ वर्षांच्या आरोपीस अटक केली.

बालाजी हा ममताचा मानसिक व शारीरिक शोषण करत होता, त्याच्या छळाला कंटाळून तिनेच आत्महत्या केल्याचा आरोप असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. ही घटना बुधवार ६ सप्टेंबरला सायंकाळी पावणेआठ वाजता अंधेरीतील महाकाली गुंफा रोड, साईधाम सेवा संघ सोसायटीमध्ये घडली. याच ठिकाणी ममता ही राहत असून, तिचे २०१० साली पंकज गुप्तासोबत विवाह झाला होता.

गेल्या एक-दिड वर्षांपासून या दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे ममता ही तिच्या दोन्ही मुलांसोबत अंधेरी येथे राहण्यासाठी आली होती, तर तिचा पती पंकज हा बिहारच्या धर्मासती गावी निघून गेला होता. ममता ही अंधेरीतील सिप्झ कंपनीत कामाला होती. ६ सप्टेंबरला ममताने तिच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

logo
marathi.freepressjournal.in