रस्ता क्रॉस करताना टॅक्सीची धडक लागून महिलेचा मृत्यू

अपघातानंतर टॅक्सीचालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
रस्ता क्रॉस करताना टॅक्सीची धडक लागून महिलेचा मृत्यू

मुंबई : रस्ता क्रॉस करताना टॅक्सीची धडक लागून झालेल्या अपघातात शहनाज पिंटो मंडल या २५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर टॅक्सीचालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी दहा वाजता माहीम कॉजवे ब्रिजजवळील के. सी रोड, खैरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरवेगात जाणाऱ्या एका टॅक्सीने शहनाजला धडक दिल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली होती. अपघातानंतर तिला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता टॅक्सीचालक तेथून पळून गेला होता. त्यामुळे त्याने तिला तातडीने वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पिंटो मंडल याच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी टॅक्सीचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in