भरवेगात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

राजावाडी रुग्णालयात दाखल केले
भरवेगात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मुंबई : भरवेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची ओळख पटली नसून, तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अपघाताची नोंद करून पळून गेलेल्या वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे. हा अपघात बुधवारी सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास विक्रोळीतील पूर्व दुतग्रती महामार्गावरील कन्नमवार नगरजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी सकाळी कन्नमवारनगरजवळ एका महिलेचा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिथे पोलिसांना एक महिला गंभीररीत्या जखमी झाल्याचे दिसून येताच तिला त्यांनी जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. भरवेगात जाणार्‍या एका अज्ञात वाहनाच्या धडकेने या महिलेचा मृत्यू झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in