डॉक्टर महिलेच्या घरी चोरी केल्याप्रकरणी महिलेस अटक

या महिलेवर सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याचा आरोप असून, महिला सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
डॉक्टर महिलेच्या घरी चोरी केल्याप्रकरणी महिलेस अटक
Published on

मुंबई : घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका डॉक्टर महिलेच्या घरी चोरी करणाऱ्या आरोपी महिलेस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. फुलमनी छोटका हौसंदा असे या महिलेचे नाव असून, ती मूळची बिहारच्या झारखंडची रहिवाशी आहे. तिच्यावर सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याचा आरोप असून, याच गुन्ह्यांत ती सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मालाड येथे तक्रारदार महिला राहत असून, ती व्यवसायाने डॉक्टर आहे. तिला एक आठ वर्षांची मुलगी असून, तिची देखभाल करण्यासाठी तिने फुलमणीला केअरटेकर म्हणून कामाला ठेवले होते. गेल्या दोन महिन्यांपासून ती तिच्याकडे कामाला होता. २५ नोव्हेंबरला ती घरी आली असता तिला घरातील कपाट उघडे दिसले. कपाटातून दहा हजाराची कॅश गायब होती. याबाबत तिने फुलमनीला विचारणा केली असात तिथे उडवाउडवीचे उत्तरे देऊन दिले होते. ही चोरी तिनेच केल्याचा संशय व्यक्त करून तिने बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करुन फुलमणी हॉंसदा हिला अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in