कौटुंबिक वादातून रॉकेल ओतून महिलेला पेटविले

तिच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सायंकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
कौटुंबिक वादातून रॉकेल ओतून महिलेला पेटविले

मुंबई : कौटुंबिक वादातून सायराबानो मसीउल्ला खान या ३२ वर्षांच्या महिलेवर रॉकेल ओतून तिला पेटविण्यात आल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. उपचारादरम्यान सायराबानोचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी दीर बरकत खान आणि नणंद अंजुम खान या दोघांना अटक केली आहे. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता भांडुप येथील सोनापूर, झकेरिया कंपाऊंड, बिस्मिल्ला चाळीत घडली. याच चाळीत सायराबानो ही तिच्या पतीसह इतर सासरच्या मंडळीसोबत राहत होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरी कौटुंबिक वाद सुरु होता. बुधवारी सकाळी तिचा बरकत आणि अंजुमसोबत वाद झाला होता. याच वादातून या दोघांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले होते. त्यात ती ९० टक्के भाजली होती. तिच्यावर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सायंकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

logo
marathi.freepressjournal.in