विदेशातून गांजा घेऊन आलेल्या महिलेस अटक

विदेशातून गांजा घेऊन आलेल्या एका महिलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. फिझा जावेद खान असे या महिलेचे नाव असून, तिच्याकडून या अधिकाऱ्यांनी दोन कोटींचा सव्वाचार किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे.
विदेशातून गांजा घेऊन आलेल्या महिलेस अटक
Published on

मुंबई : विदेशातून गांजा घेऊन आलेल्या एका महिलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. फिझा जावेद खान असे या महिलेचे नाव असून, तिच्याकडून या अधिकाऱ्यांनी दोन कोटींचा सव्वाचार किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. अटकेनंतर तिला किल्ला न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही वर्षांत विदेशात ड्रग्जची तस्करी होत असल्याने हवाई गुप्तचर विभागाने विशेष खबरदारी घेतली होती. रविवारी पहाटे फिझा नावाची एक महिला बँकॉंक येथून आली होती. तिची हाचाल संशयास्पद वाटत होती. ती घाईघाईने विमानतळाबाहेर जाण्याच्या प्रयत्नात होती. त्यामुळे तिला या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्या सामानाची झडती घेतल्यानंतर या अधिकाऱ्यांना कपड्याच्या आत लपवून ठेवलेला गांजा सापडला. ४ किलो २७३ ग्रॅम वजनाच्या या गांजाची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे. चौकशीत तिला हा गांजा बँकॉक येथे एका व्यक्तीने दिले होते. त्यासाठ तिला ठरावीक रकमेचे कमिशन देण्यात आले होते. मात्र विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच तिला या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.

logo
marathi.freepressjournal.in